Maharashtra Bridge Course Class 8 Math Pre Test PDF All Question and Solution by Expert Teacher. Bridge Course Class 8 Math PDF Download for Marathi Medium, Math Medium Students.
Class 8 Bridge Course 2023-24 Math Pre Test
प्र. 1) चौकटीत योग्य उत्तर लिहा.
1) कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज ——- असते.
उत्तर: कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 degree असते.
2) 53 x 54 = 57
उत्तर: 53 + 4= 57
3) चौरसाचे क्षेत्रफळ =
उत्तर: चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)२
4) -7x x 8 =
उत्तर:
-7x x 8 = -56x
5) 2 / 3 x 4 / 3 =
उत्तर:
2 / 3 x 4 / 3 = (2 x 4) / (3 x 3) = 8 / 9
2 / 3 x 4 / 3 = 8 / 9
प्र. 2) सोडवा. (8)
1) (2x + 4y) + (3x + 2y)
उत्तर:
येथे आपल्याला बेरीज करायची आहे.
तर आपण x पदांची बेरीज करून घेऊ. व नंतर y पदांची बेरीज करून घेऊ.
2x + 4y
+ 3x + 2y
——————————————-
5x + 6y
(2x + 4y) + (3x + 2y) = 5x + 6y
2) -7/ 8 ÷ -3 / 6 =
उत्तर:
-7/ 8 x -6 / 3
= (-7 x -6) / (8 x 3)
= 42 / 24
३ ने भागून
= 14 / 8
२ ने भागून
-7/ 8 ÷ -3 / 6 = 7 / 4
3) मसावि काढा.
8, 12
उत्तर:
8, 12 चा मसावी = 4
4) रमेशने द.सा.द.शे. 10 दराने 1200 रुपये 4 वर्षांसाठी बँकेकडून कर्ज घेतले, तर मुदतीनंतर त्याला बँकेस किती व्याज दयावे लागेल?
उत्तर:
येथे, मुद्दल =1200 रुपये
दर = द.सा.द.शे. 10
मुदत= 4 वर्षे
सरळव्याज = मुद्दल x दर x मुदत / १००
सरळव्याज = 1200 रुपये x 10 x 4 / 100
सरळव्याज = 480 रुपये
रमेशला मुदतीनंतर बँकेस 480 रुपये दयावे लागेल.
5) 5 पेनांची किंमत 60 रुपये आहे, तर अशा 9 पेनांची किंमत किती?
उत्तर:
5 पेनांची किंमत 60 रुपये आहे.
आपण एका पेनाची किमत काढून घेऊ.
१ पेन किमत = 60 रुपये / 5 = 12 रुपये
आता आपल्याला 9 पेनांची किंमत काढायची आहे.
9 पेनांची किंमत = 12 रुपये x 9 = 108 रुपये
9 पेनांची किंमत 108 रुपये असेल.
6) एका चौरसाची बाजू 6 सेमी असल्यास त्याची परिमिती किती?
उत्तर:
चौरसाची बाजू = 6 सेमी
चौरसाची परिमिती = 4 x बाजू
चौरसाची परिमिती = 4 x 6 सेमी
चौरसाची परिमिती = 24 सेमी
7) एका कोनाचे माप 60° असल्यास त्याच्या कोटीकोनाचे माप काढा.
उत्तर:
एका कोनाचे माप = 60°
आपल्याला माहिती आहे
कोनाचे माप + त्याच्या कोटीकोनाचे माप = 90°
60° + त्याच्या कोटीकोनाचे माप = 90°
कोटीकोनाचे माप = 90° – 60°
कोटीकोनाचे माप = 30°
8) 100° मापाचा ZABC काढा व तो दुभागा.
उत्तर:
9) गुणाकार करा:
-5 x 7 / 2
उत्तर:
-5 / 1 x 7 / 2
= ( -5 x 7 ) / ( 1 x 2)
= – 35 / 2
-5 x 7 / 2 = – 35 / 2
10) पदावली सोडवा.
(13 x 4) ÷ 2 – 26
उत्तर:
पहिल्यांदा कंस सोडवून घेऊ.
(13 x 4) = 52
52 ÷ 2 – 26
आता भागाकार करू
52 ÷ 2 = 26
26 – 26 = 0
(13 x 4) ÷ 2 – 26 = 0
प्र. 3) सोडवा.
1) जोडस्तंभालेखाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही 3)
i) सागरला इंग्रजी विषयात किती गुण मिळाले?
उत्तर: सागरला इंग्रजी विषयात 69 गुण मिळाले.
ii) रसिकाला विज्ञान विषयामध्ये सागरपेक्षा किती गुण जास्त मिळाले?
उत्तर: रसिकाला विज्ञान विषयामध्ये सागरपेक्षा 14 गुण जास्त मिळाले
iii) सागरच्या मराठी व गणित विषयांमध्ये किती गुणांचा फरक आहे?
उत्तर: सागरच्या मराठी व गणित विषयांमध्ये 18 गुणांचा फरक आहे
iv) रसिकाच्या चारही विषयांच्या गुणांची बेरीज किती होते?
उत्तर:
रसिकाच्या चारही विषयांच्या गुणांची बेरीज = 75 + 61 + 75 + 79 = 290 गुण
रसिकाच्या चारही विषयांच्या गुणांची बेरीज 290 गुण होते.
2) मांजरी हायस्कूल, मांजरी, ता. सांगोला विद्यालयातील काही विदयार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांची संख्या खाली दिली आहे. त्यावरून खालील सारणी पूर्ण करा.
1, 4, 2, 4, 3, 3, 5, 2, 1, 3, 5, 2, 4, 3, 1, 4, 3, 2, 3, 4.
उत्तर:
3) द.सा.द.शे. 6रुपयेदराने5वर्षांचे25000रुपयेमुद्दलाचेसरळव्याजकितीहोईल?
उत्तर:
In case You missed: Bridge Course Class 8 English Solution